आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांपासून पाण्‍यावर तरंगतोय 21 किलोचा दगड; दगडावर लिहिलेय ‘राम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- जिल्‍ह्यातील करजणमध्‍ये असलेल्‍या शिववाडी आश्रमात रामेश्वरमवरुन आणलेला एक दगड मागील 20 वर्षांपासून पाण्‍यावर तरंगत आहे. येथे येणा-या भक्‍तांना या दगडाविषयी विशेष श्रद्धा आहे. भक्‍तांच्‍या मते रामसेतू बनवण्‍यासाठी याच दगडांचा उपयोग केला असावा. काय आहे इतिहास....

- आश्रमातून मिळालेल्‍या माहितीनुसार, शिववाडी आश्रमाचे महंत भोलागिरी बापू यांनी 20 वर्षांआधी रामेश्वरम येथून हा दगड आणला होता.
- 21 किलो वजनाच्‍या या दगडावर 'राम' लिहीले होते.
- करजणमध्‍ये आणल्‍यावर या दगडाची मिरवणूक काढण्‍यात आली.
- त्‍यानंतर एक कुंड तयार करून हा दगड ठेवण्‍यात आला.
- हा दगड आजही पाण्‍यावर तरंगलेला आहे. येथे शिवशंकराचे मंदिर आहे.
तज्‍ज्ञ काय म्‍हणतात....
- बडोदा एम.एस. यूनिवर्सिटीमधील तज्‍ज्ञ अरुण आर्य यांच्‍या मतानुसार, पाण्‍यावर तरंगणारा हा दगड समुद्री जीव कोरल असू शकतो.
- जिवंत कोरल प्राणी दगडासारखा दिसतो. मृत्‍यूनंतरही तो दगडासारखा दिसतो.
- तो आतून पोकळ असल्‍याने पाण्‍यावर तरंगतो.
- कोरल मुख्यत: समुद्राच्‍या पाण्‍यात आढळतात. त्‍याचे वजन 20 ते 50 किलोपर्यंत असते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो....