आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेव्ह पार्टीवर छापाः पत्नीला सत्यनारायण कथेला पाठवून तरूणींवर उधळले पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूरः उदयपूर-अहमदाबाद हायवेवर बारापाल येथील उदय पॅलेस हॉटेल अँड रिसॉर्टमध्ये रविवारी रात्री रेव्ह पार्टी करत असलेल्या 83 लोकांना पोलिसांनी छापा मारून अटक केली. यामध्ये अहमदाबाद, किशनगढ़, डूंगरपुर, वलसाड, सूरतचे 60 मार्बल टेक्सटाइल व्यवसायीकांचा समावेश होता. या सर्वांसोबत 16 तरूणींनाही अटक करण्यात आली. यामधील काही व्यावसायीक आपल्या पत्नीला आणि घरातील इतर महिलांना सत्यनारायणाच्या कथेला पाठवून स्वतः या पार्टीत आले. अटक झालेल्या लोकांमध्ये तीन दलाल, हॉटेल मालकाची पत्नी आणि काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पार्टीत दारूसोबत नशेच्या गोळ्यासुध्दा दिल्या जात होत्या. तसेच इतर खोल्यांमध्ये तरूण-तरूणी अत्यावस्थेत सापडले.
पत्नीला सत्यनारायणाच्या कथेला पाठवून स्वतः आले रेसॉर्टवर...
अटक झालेल्या 60 व्यापारी 7 गटांमध्ये वेगवेगळ्या रेसॉर्टवर गेले. रेसॉर्टकडून त्यांना मॅसेज पाठवण्यात आले होते. गुजरातवरून आलेल्या तीन गट नाथद्वाऱ्याला दर्शन करण्यासाठी आले होते. यामध्ये एक असाही ग्रूप होता, जो सत्यनारायणाच्या कथेला जाणार होता. मात्र या पुरूषांनी त्यांच्या पत्नीला तसेच कुटुंबातील इतर महिला सदस्यांना सत्यनारायणाची कथा ऐकण्यासाठी पाठवून दिले आणि स्वतः येथे पार्टी करण्यासाठी आले.
रसॉर्ट मालक हिस्ट्रीशीटर पंकज बंसल घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर पंकजची पत्नी नीलिमा बंसलकडून 2 लाख 19 हजार जप्त करण्यात आले. डीएसपी रानू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय पॅलेस हॉटेल अँड रेसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत रविवारी रात्री गोवर्धन विलास पोलिस ठाण्याने छापा मारला. रेसॉर्ट मालक हिस्ट्रीशीटर पंकज बंसल यांची पत्नी नीलिमा बंसल, सेक्टर-14 निवासी दलाल दाम्पत्य अर्जुन-आसू चौहान, वलसाड निवासी वकील उर्फ संजय पांचाल, जोधपुर निवासी अजय दाधीच आणि वेगवेगळ्या शहरातून आणण्यात आलेल्या 16 तरूणी आणि 60 व्यापाऱ्यांसोबत 83 लोकांना पीटा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येईल, तेथून यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल.
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचे इतर PHOTO