जूनागड (गुजरात) - भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाने आपणहून एक वाद ओढवून घेतला आहे. नव्यानेच लग्न झालेला जडेजा बुधवारी पत्नी रीवाबासोबत गिरच्या जंगल सफारीवर गेला होता. येथे त्याने सिंह काही फूटांवर असताना पत्नीसोबत फोटो सेशन केले. हे फोटो व्हायरल झाले आहेत. गुरुवारी फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याच्याविरोधात चौकशी सुरु केली आहे. गिर मध्ये गाडीच्या खाली उतरुन फोटो घेण्यास सक्त मनाई आहे.
फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघड
>> गिर सफारीमध्ये रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रीवाबा यांनी जिप्सीमधून खाली उतरुन सिंहांच्या जवळ जात फोटो घेतले होते.
>> हा प्रकार बुधवारी घडला होता.
>> जडेजा पती-पत्नी सिंहापासून अवघ्या 10-12 फूटांवर होते. फोटोतूनही ते स्पष्ट दिसत आहे. हे कृत्य बेकायदेशीर मानले जाते. त्यासोबतच अतिशय जोखमीचे होते.
>> आणखी एका फोटोमध्ये जडेजा मित्र आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांसोबत दिसत आहे.
>> जडेजा मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस गिरच्या सफारीवर होता.
फॉरेस्टचे अधिकारी काय म्हणतात
- गिर नॅशनल पार्क अँड सेन्चुरीचे (जीएनपीएस) प्रमुख अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की आम्ही पार्कच्या अधीक्षकांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
- तर, अधीक्षक राम रतन लाला म्हणाले, 'आम्हाला माहिती मिळाली आहे की रवींद्र जडेजाने गाडीतून उतरुन सिंहासोबत सेल्फी घेतला होता. त्यावेळी दोन अधिकारी ही तिथे उपस्थित होते. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. जंगलामध्ये फिरत असताना गाडी खाली उतरणे गुन्हा आहे.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जडेजाने सिंहासोबत कसे पोज देऊन काढले फोटो
>> गिर नॅशनल पार्कमध्ये गोड बातमी
(Pls Note - तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)