आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप महिला नेत्याचे अश्लील फोटो इंटरनेटवर व्हायरल, बदनाम केल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरात निवडणुकीच्या ठीक आधी भाजप नेत्या रेश्मा पटेल यांचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा यांचा आरोप आहे की, त्यांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरू आहे. अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी रेश्मा पटेल यांनी सनी पटेल नावाच्या व्यक्तीला जबाबदार ठरवले आहे.
- वास्तविक, फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडिता रेश्मा यांनी त्या तरुणाविरोधात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
- यावर सुनावणी करत कोर्टाने म्हटले होते की जर याप्रकरणी सत्यता समोर आली तर सायबर क्राइम ब्रांच एफआयआर दाखल करेल.
- तथापि, रेश्मा या पाटीदार आरक्षण आंदोलनात मोठी भूमिका बजावत होत्या. परंतु त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.
- सूत्रांनुसार, यामुळे पाटीदारांमध्ये त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे.
 
रेश्मा यांना केशोद किंवा साबरमतीचे तिकीट
- असे मानले जात आहे की, भाजपमध्ये सामील झाल्यानंतर रेश्मा यांना केशोद किंवा साबरमतीहून भाजपचे तिकीट मिळू शकते.
- त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल यांना तिकिटाचे सौदागर म्हटले होते. दुसरीकडे हार्दिक यांनी एक ट्विट करून रेश्मा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
 
सिंगल मदर आहेत रेश्मा
- 'भास्कर'शी बोलताना रेश्मा म्हणाल्या होत्या की, "मी सिंगल मदर आहे, मला जुळी मुले आहेत. एक मुलगा-एक मुलगी. पतीपासून वेगळी राहते. दोन्ही मुलांना पतीच सांभाळतात. कधीकधी मुलांना आणि पतीला भेटायला जाते. मुलांना त्यांच्या वडिलांकडे ठेवून मी समाजासाठी काम करत आहे."
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...