आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित सात अामदारांचे सभापतीकडे राजीनामे सादर, शंकरसिंह वाघेला यांचा निर्णय अधांतरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार अहमद पटेल यांच्याविरोधात मतदान केलेल्या ७ आमदारांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सभापती रमणलाल व्होरा यांनी शुक्रवारी येथे सांगितले.  

गुजरात काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला आणि इतर सात आमदारांची पक्षातून ६ वर्षांसाठी  ९ ऑगस्ट रोजी हकालपट्टी करण्यात आली होती.  या आमदारांनी अहमद पटेल यांच्याविरोधात मतदान केले होते. त्यापैकी सात आमदारांनी निवासस्थानी माझी भेट घेऊन गुरूवारी रात्री विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले, अशी माहिती सभापती व्होरा यांनी दिली. या सात आमदारांमध्ये शंकरसिंह वाघेला यांचे सुपुत्र महेंद्रसिंह यांचाही समावेश आहे. राघवजी पटेल आणि भाेलाभाई गोहेल यांचे मतदान निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांनीही आमदारकीचे राजीनामे सादर केले आहेत. आमदारकीचे राजीनामे देणाऱ्यांत अमित चौधरी, सी. के. राहुलजी, धमेंद्रसिंह जडेजा आणि करमसिंह पटेल यांचा समावेश आहे.  

तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा धमक्या दिल्यावरून राजीनामे देत आहात काय? अशी विचारणा मी या आमदारांना केली होती. तेव्हा त्यांनी नकारार्थी उत्तर दिले, असे सभापतींनी सांगितले.  आम्ही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर करण्याचे साेपस्कार पूर्ण केले, असे महेंद्रसिंह यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसच्या सात आमदारांनी बुधवारी रात्री राजीनामे दिले. अन्य गेल्या महिन्यात राजीनामे दिलेल्या सहापैकी तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

शंकरसिंह वाघेला यांचा निर्णय अधांतरी
तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे महेंद्रसिंह यांनी सांगितले. मात्र, आठ आमदारांना काँग्रेसमधून काढण्यात आले असून माझे पिता शंकरसिंह वाघेला यांचा त्यात समावेश आहे. त्यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, असे त्यांनी सांगितले.  भाजपमध्ये प्रवेश घेतलेले बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल असे तीन आमदार असून रामसिंह परमार, छन्नाभाई चौधरी व मानसिंह चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला नाही. भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या बलवंतसिंह राजपूत यांनी अहमद पटेल यांच्याविरोधात राज्यसभेची निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले.
बातम्या आणखी आहेत...