आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Historical Places Of Gujarat. Restaurant Situated In Cemetery In Ahmedabad News In Marathi

कब्रस्थानात वसलंय हे अनोखे रेस्तरॉं; 12 कबरींजवळ बसून ग्राहक घेतात चहाचा आस्वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: कब्रस्थानमध्ये थाटात सुरु असलेले 'न्यू लकी रेस्तरॉं')
अहमदाबाद- जगातील चित्र-विचित्र रेस्तरॉंविषयी तुम्ही ऐकले असेल. मात्र, गुजरातमधील अहमदाबाद येथे असे एक अनोखे रेस्तरॉं आहे. एक पुरातन कब्रस्थानमध्ये हे रेस्तरॉं आहे. रेस्तरॉंमध्ये 12 कबर आहेत. लोक कबर शेजारी मांडलेल्या टेबलवर बसून चहाचा पिण्याचा आनंद घेतात. कब्रस्थानमध्ये असून देखील रेस्तरॉंमध्ये नेहमी ग्राहकांची वर्दळ असल्याचे रेस्तरॉंचे मालक कृष्णन कुत्ती यांनी सांगितले आहे.

संपूर्ण गुजरात राज्यात 'न्यू लकी रेस्तरॉं' प्रसिद्ध आहेत. रेस्तरॉंमध्ये 12 कबर आहेत. त्यांच्या आसपास ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करण्‍यात आहे. रेस्तरॉं उघडल्यानंतर स्वच्छता झाल्यानंतरी कबरवर फूलांची चादर अर्पण केली जाते. रेस्तरॉंसह कबरीही सजवल्या जातात, अशी माहिती कृष्णन् कुत्ती यांनी दिली.

कृष्णन कुत्ती यांच्या मते, कब्रस्थान एक एक पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला पुर्वजांचे नेहमी आशीर्वाद मिळतात. त्यामुळे रेस्तरॉंमध्ये ग्राहकांची नेहमी गर्दी असते. सन 2004 जगविख्यात दिवंगत चित्रकार एमएफ हुसेन यांनी न्यू लकी रेस्तरॉंला भेट दिली होती. त्यांनी एक चित्र बनवून कृष्णन् कुत्ती यांना ती भेट दिली होती.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, कब्रस्थानात वसलेल्या रेस्तरॉंचे फोटो...