आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योग्य वेळी पोलिसांसमोर येईन, स्वयंसेवी संस्था आपल्याविरूध्‍द कट चालू - आसारामबापू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत (गुजरात) - योग्य वेळी पोलिसांसमोर हजर होईन, असे आसारामबापू यांनी म्हटले आहे. परदेशी निधीवर चालणारी स्वयंसेवी संस्था आपल्याविरुद्ध कट रचत आहे. याआधी जादूटोण्याचा आरोप करण्यात आला. दहा जणांच्या जबाबानंतर निर्दोष मुक्त झालो, असे त्यांनी सांगितले.


येथील जहांगीरपूराच्या आश्रमात आसारामबापू म्हणाले, या प्रकरणातही मी निर्दोष मुक्त होईल. ‘सौ सुनार की एक लुहार की’ या उक्तीप्रमाणे लोहाराची वेळ कधी येणार, अशी विचारणा केली तेव्हा आसाराम यांनी आपण जेव्हा हजर राहू, असे उत्तर दिले. मला देश सोडून जाण्याची गरज वाटत नाही. आपल्याविरुद्ध तयार केलेले वातावरण हा एका कटाचा भाग आहे. आसाराम यांना समन्सबाबत विचारणा केली तेव्हा आम्ही कुणासमोर हजर राहणार नाहीत, असे सांगितले. मात्र, त्यात तत्काळ सुधारणा करत त्यांनी योग्य वेळी हजर होऊ, असे म्हटले. दिल्लीतील त्यांच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी त्यांची तुलना शिखांचे धर्मगुरू नानक देव यांच्याशी केल्याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी यामागे विदेशी कट असल्याचा आरोप केला. हिंदू व शिखांमध्ये भांडण व्हावे, अशी या शक्तीची इच्छा आहे. यासाठी दिल्लीत आपल्या पोस्टरसोबत नानक देव यांचेही पोस्टर लावण्यात आले आहे.


सुरतमध्ये संतांचे संमेलन : आसाराम यांनी बुधवारी सुरतमध्ये संतांचे संमेलन आयोजित केले. तापी किना-यावरील जहांगीरपुरा आश्रमामध्ये जवळपास 20-25 साधूंना अन्य राज्यांतून बोलावण्यात आले होते. या वेळी मुस्लिम समाजाचे मौलवीही उपस्थित होते.