आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: गुजरातच्या कच्छमध्ये पोलिस आणि अल्पसंख्याकात वादानंतर कर्फ्यु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - भुजच्या सरपटनाका परिसरात झालेल्या गोंधळानंतरची स्थिती. इन्सेट : हवेत गोळीबार करणारा सुरक्षारक्षक.

भुज - गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील सरपटनाका परिसरात रविवारी सायंकाळी अल्पसंख्याक समुदाय आणि पोलिसांत वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक युवकाने एका सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. त्यामुळे अल्पसंख्याकांमध्ये संताप निर्माण झाला. त्यानंतर येथे कर्फ्यु घोषित करण्यात आला. आजही येथे कर्फ्यु कायम राहणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोक इंटरनेटवर अक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणा-या त्या तरुणाला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करत होते. गेल्याच आठवडयात या युवकाला अटक करण्यात आली होती.

कच्छ-भुज जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डी.एन.पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा गर्दीने सरपटनाका पोलिस ठाण्यावर दगडफेक सुरू केली. त्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

घटनास्थळाचे इतर फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...