आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RJ Kunal Surrenders Before Police In Bhumi Suicide Case In Gujarat

भूमि सुसाइड केस, 2 दिवसांपासून अहमदाबादमध्ये लपून बसला होता पती RJ कुणाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- येथील प्रसिद्ध आरजे कुणाल काल पोलिसांना शरण आला. गेल्या दोन दिवसांपासून तो अहमदाबादमधील सरखेज परिसरात लपून बसला होता. त्याची पत्नी आणि आरजे भूमिने गेल्या गुरुवारी इमारतीच्या 10 व्या मजल्याहून उडी मारुन आत्महत्या केली होती. दोघांचे केवळ दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
दोघांमध्ये झाले होते भांडण
लग्न झाल्यानंतर कुणाल आणि भूमि थायलंडला हनिमुनसाठी गेले होते. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भूमिच्या कुटुंबीयांनी ही बाब पोलिसांना सांगितली आहे. हनिमुन आटोपून परत आल्यावर भूमि आईवडीलांकडे राहायला आली होती. ती कुणालच्या घरी राहत नव्हती. आत्महत्येमागे हे कारण असावे असा पोलिसांचा संशय आहे.
मित्रांना केला होता सुसाइडचा एसएमएस
गेल्या गुरुवारी दुपारी भूमिने इमारतीच्या 10 व्या मजल्याहून उडी मारुन आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने एका मित्राला एसएमएस करुन आत्महत्या करीत असल्याचे कळवले होते. त्यानंतर त्या मित्राने याची माहिती भूमिच्या कुटुंबीयांना दिली होती.
पुढील स्लाईडवर वाचा, कशी झाली होती दोघांची भेट... असे पडले होते प्रेमात.... असे थाटात केले होते लग्न....