आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RJ Kunal\' Wife Kills Self Within Two Months Of Marriage In Madhya Gujarat

फेमस RJ च्‍या पत्‍नीची आत्‍महत्‍या, दोनच महिन्‍यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाल आणि भूमि यांचा फाइल फोटो. इन्‍सेट भूमिचा मृतदेह. - Divya Marathi
कुणाल आणि भूमि यांचा फाइल फोटो. इन्‍सेट भूमिचा मृतदेह.
अहमदाबाद - अहमदाबादमधील प्रसिद्ध रेडिओ जॉकी कुणाल देसाई यांच्‍या पत्‍नीने गुरुवारी दुपारी 2.30 वाजता सचिन टॉवर या इमारतीच्‍या दहाव्‍या मजल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केली. ही घटना शहरातील श्यामल परिसरात घडली. भूमि पांचाल (28) असे मृत महिलेचे नाव असून, दोनच महिन्‍यांपूर्वी तिचे लग्‍न झाले होते. दरम्‍यान, आत्‍महत्‍येपूर्वी तिने आपल्‍या मित्राला एसएमएस पाठवला होता.
एसएमएसमध्‍ये काय म्‍हटले....
- आनंद नगर पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक पी.व्‍ही. जडेजा यांनी सांगितले, 'भूमि हिने सचिन टॉवर' इमारतीच्‍या दहाव्‍या मजल्‍यावरून उडी मारली.
- आत्‍महत्‍या करण्‍यासाठी या इमारतीपर्यंत ती आपल्‍या कारने आली होती.
- घटनास्‍थळावर पोहोचल्‍यावर 2 वाजताच्‍या जवळपास तिने मितेश सोनी यांना एसएमएस करून आत्महत्या करणार असल्‍याची माहिती दिली.
- नंतर 2.30 वाजताच्‍या सुमारास इमारतीवरून उडी मारली.
- एसएमएस मिळताच मितेशने भूमिच्‍या कुटुंबाला माहिती देत तत्‍काळ घटनास्‍थळावर धाव घेतली.
- या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दोनच महिन्‍यांपूर्वी केला होता प्रेमविवाह.... का केली आत्‍महत्‍या.... कुटुंबीयांनी काय प्रश्‍न उपस्‍थ‍ित केला....