आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरक्षा कंपनीच्या गोदामातून लुटले तब्बल १४ किलो सोने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - एटीएममध्ये रक्कम भरणाऱ्या सुरक्षा कंपनीच्या गोदामातून १४ किलो सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या सोन्याची किंमत ४ कोटी १४ लाख इतकी असल्याचे सांगण्यात येते. या लुटीमध्ये एका महिलेसह दोन पुरुष सहभागी असल्याचे सांगण्यात येते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोन्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर लूट होण्याची अहमदाबादेतील ही पहिलीच घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठाखली सहा रस्त्यावर एसआयएस कंपनीचे गोदाम आहे. शुक्रवार-शनिवारी रात्री उशिरा एका महिलेसह दोन माणसे तेथे पोहोचली. गोदामात कामावर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना त्यांनी लोखंडी गज आणि हातोड्याने मारहाण सुरू केली. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी गोदामातील १४ किलो २०० ग्रॅम सोन्याचा बॉक्स उचलून नेला. पोलिसांनी सांगितले, आम्ही सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आहे. यातील एक हल्लेखोर महिला होती. याच आधारे महिलेचा शोध सुरू केला आहे. तसेच या घटनेत सुरक्षा रक्षकांचाही काही सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...