आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Row Over School Textbooks Of Gujrat Government Which Say Stem Cell Technology Was Invented In India

स्‍टेम सेल तंत्राने झाला होता कौरवांचा जन्म, गुजरात शाळेत शिकवला जातोय अभ्यासक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : आरएसएसची शिक्षण संस्था विद्या भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य दिनानाथ बत्रा. अमेरिकन डॉक्टर वेंडी डोनिगर यांचे पुस्तक 'द हिंदुज़ः अ‍ॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री' हे पुस्तक भारतातून हद्दपार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

नवी दिल्‍ली - गुजरातच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणा-या अभ्यासक्रमाने पुन्हा एक नवा वाद समोर आणला आहे. स्टेम सेल तंत्राचा विकास महाभारताच्या काळातच झाला होता, असे यात म्हटले आहे. तर कारचा शोधही वैदिक काळातच लागला होता, असा दावाही करण्यात आला आहे. ही पुस्तके आरएसएसची शैक्षणिक शाखा असणा-या विद्या भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य दिनानथ बत्रा यांनी लिहिली आहेत. गुजरात राज्य शालेय पाठ्यपुस्तक मंडळाने या पुस्तकांचा गुजरातीमध्ये अनुवाद केला आहे. विशेष म्हणजे मोदींनी यापुस्तकांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. ही पुस्तके अनिवार्य अभ्यासक्रमाचा भाग नसून, ती केवळ संदर्भासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाभारत काळात लागला स्टेम सेल तंत्राचा शोध
दिनानाथ बत्रा यांच्या आठ पुस्तकांबाबत हा वाद आहे. यात करण्यात आलेल्या दाव्यानुसार भारतात इतिहासाची जी पुस्तके आहेत त्यावर पाश्चिमात्य देशांची छाप आहे. गुजरातमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील मुलांना या पुस्तकांच्या आधारे शिक्षण दिले जात असून, त्यातच भारतात स्टेम सेल तंत्राचा वापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
'तेजोमय भारत' नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे की, अमेरिका स्टेम सेल तंत्रज्ञानाचा शोध लावल्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्यक्षात भारत महाभारत काळापासून या तंत्राचा वापर केला जात होता. या पुस्तकातील माहितीनुसार, कुंतीचा पुत्र सूर्यासारखा तेजस्‍वी होता. गांधारीला जेव्हा दोन वर्षे गर्भधारणा झाली नाही, त्यावेळी तीने गर्भपात केला. यावेळी तिच्या गर्भाशयातून मोठ्या प्रमाणावर मांस निघाले. ऋषि द्वैपायन व्‍यास यांनी या मांसामध्ये औषधी लावून एका थंड टाक्यात ठेवले. त्यानंतर याचे 100 तुकडे केले आणि प्रत्येक तुकडा स्वतंत्र तुपाच्या टाकीत ठेवला. दोन वर्षांनी याच टाक्यांमधून 100 कौरवांचा जन्म झाला.

वैदिक काळातही होती कार
'तेजोमय भारत' मधील माहितीनुसार वैदिक काळातही कार होत्या. त्याववेळी त्यांना अनश्व रथ म्हटले जात होते. साधारणपणे घोडे रथ ओढतात. पण अनश्व रथ हा घोड्याशिवाय धावू शकत होता. त्याला यंत्र रथ असेही म्हटले जात होते.

शिक्षण मंत्र्यांचा बचावात्मक पवित्रा
गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुड़ास्‍मा यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना ही केवळ संदर्भासाठी असलेली पुस्तके असल्याचे म्हटले आहे. ही पुस्तके अभ्यासक्रमाचा भाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ मुलांनी प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचावी एवढाच उद्देश असल्याचे ते म्हणाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, वादग्रस्त पुस्तकांचे फोटो...