आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS And BJP Leaders Behind Narendra Modi Topi Controversy

नरेंद्र मोदींच्‍या 'टोपीकांड'मागे संघ-भाजपच्‍या पदाधिका-यांचेच षडयंत्र?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- नरेंद्र मोदी यांच्‍या 'सद्भावना मिशन'दरम्‍यान घडलेल्‍या टोपीकांडामागे संघ-भाजपच्‍याच उच्‍च पदाधिका-याचाच हात होता. सप्‍टेंबर 2011 मध्‍ये घडलेल्‍या या घटनेबाबत भारतीय जनता पक्षाच्‍या अल्‍पसंख्‍यांक मोर्चाचे तत्‍कालीन प्रदेशाध्‍यक्ष यासीन अजमेरवाला यांनी खुलासा केला आहे. याबाबत त्‍यांनी मोदींना पत्रही पाठविले आहे.

अजमेरवाला म्‍हणाले, व्‍हीव्‍हीआयपी पास नसल्‍यास मोदीनी कोणीही भेटू शकत नाही. माझ्या म्‍हणण्‍यावरुन कोणी इमामाला प्रवेश देईल, एवढे सामर्थ्‍य नाही. या घटनेमागे संघ आणि भाजपच्‍याच उच्‍च पदाधिका-यांचा हात होता. मात्र, त्‍यांची नावे मी आत्ताच उघड करु इच्छित नाही. त्‍यांची नावे फक्त मोदींनाच सांगावी, अशी माझी इच्‍छा आहे. या घटनेत मला लक्ष्‍य करण्‍यात आले आणि मोदींची प्रतिमा मलिन करण्‍याचा प्रयत्‍न झाला, असे अजमेरवाला म्‍हणाले.