आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान स्वामीनारायण यांना घातला RSS चा गणवेश, कॉंग्रेस म्हणाली- हे तर भगवाकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- सुरतमधील स्वामीनारायण मंदिराच्या मुर्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश घातल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या मंदिरात एका आठवड्याचे शिबिर सुरु होते. या दरम्यान मुर्तीला संघाचा गणवेश घालण्यात आला. यावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. मुर्तीचेही 'भगवाकरण' करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
सुरतच्या स्वामीनारायण मंदिरात एका आठवड्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सोमवारी शिबिराचा समारोप झाला. यावेळी स्वामीनारायण यांच्या मुर्तीला संघाचा गणवेश घालण्यात आला. त्यानंतर संघाचे प्रांत प्रवक्ते प्रदीप जैन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. बघता बघता हा फोटो व्हायरल झाला. त्यावर तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या.
भेट मिळाला होता गणवेश
स्वामीनारायण मंदिराचे विश्वप्रकाशजी यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी आम्हाला हा गणवेश एका स्थानिक भाविकाकडून भेट म्हणून मिळाला होता. स्वामीनारायण यांच्या मुर्तीला वेगवेगळे ड्रेस घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे आम्ही भाविकाने दिलेला गणवेश मुर्तीला घातला. यात काही चुकीचे नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, प्रदीप जैन यांनी टाकलेली फोटोची पोस्ट.....
बातम्या आणखी आहेत...