आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sabaramati Riverfront Ready To Welcome To Narendra Modi In Xi Jinping

मोदी, जिनपिंग यांच्या स्वागतासाठी नवविवाहितेसारखे सजले आहे अहमदाबाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- साबरमती रिव्हरफ्रंट.)
अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी या वाढदिवसाला 17 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये येणार आहेत. याच दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही गुजरातमध्ये येत आहेत. त्यामुळे मोदींच्या वाढदिवसाला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुजरात सरकारने मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच गुजरातमध्ये येत आहेत. शी जिनपिंग हेही मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतात येत आहेत. यानिमित्त गुजरातमधील सगळ्या सरकारी इमारती, बस स्थानक, प्रमुख ठिकाणे आणि ऐतिहासिक स्थळे यांच्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही खास ठिकाणे निओन बल्ब आणि फुलांनी सजवण्यात आली आहेत. अहमदाबादसह गांधीनगराला अगदी नवविवाहितेसारखे सजवण्यात आले आहे. मोदी आणि जिनपिंग अहमदाबाद येथील एकदिवसीय दौऱ्यात साबरमती रिव्हरफ्रंट येथे डिनर घेणार आहेत.
रिव्हरफ्रंटवर दोन विशाल स्टेज
डिनरसाठी रिव्हरफ्रंटवर दोन वेगवेगळे स्टेज तयार करण्यात येत आहेत. येथे डिनरपूर्वी गुजराती गरबा आणि आदिवासी लोकनृत्य सादर केले जाणार आहे. रिव्हरफ्रंटच्या समोर साबरमती गांधी आश्रम आहे. या आश्रमालाही एखाद्या नवरीप्रमाणे सजवण्यात आले आहे.
ही तयारी करण्यात आली आहे
- व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी वॉटर आणि फायर फ्रूप टेंट तयार करण्यात आले आहेत.
- रिव्हरफ्रंटवर मोदी आणि जिनपिंग सुमारे एक किलोमीटर चालत जात चर्चा करतील.
- डिनरमध्ये शाकाहारी पारंपरिक गुजराती पदार्थ सर्व्ह केले जाणार आहेत.
- हॉटेल ताज उमेदला कॅटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, साबरमती रिव्हरफ्रंटची नेत्रदिपक छायाचित्रे....