आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराचीत शिजत होता मोदी सरकारची जगात नाचक्की करण्याचा प्लॅन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर 2012) गुजरातमधील सर्वात सुरक्षीत समजल्या जाणा-या साबरमती तुरूंगात दहशतवाद्यांनी भुयार खोदण्यास प्रारंभ केला होता. या तुरुंगात गुजरात बॉम्बस्फोटांचे आरोपी कैद आहेत.
दहशतवाद्यांनी केवळ जेवणाची प्लेट आणि चमचा घेऊन 213 फूट लांब भूयाराचे खोदकाम केले होते. जेव्हा या भूयाराची छायाचित्रे समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. यात एकच चांगली बाब होती, ती ही की, भूयार पूर्ण होण्याआधी (फेब्रुवारी 2013) गुजरात पोलिसांना याची माहिती मिळाली आणि जगभर त्यांची नाचक्की होण्यापासून ते वाचले. हे भूयार पूर्ण होऊन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असते तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकावरही याचे खापर फुटले असते.
आता या भूयारासंबंधी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सुत्रे पाकिस्तानच्या कराचीत असल्याचे उघड झाले आहे. एनआयएच्या ताब्यातील यासिन भटकळच्या चौकशीत हा खळबळजनक खुलासा झाला आहे.