आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अडीच तासांत 23 सिहांनी बघितले सचिनला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनागड (गुजरात) - सर्वसामान्य लोकांसाठी सिंहाचे दर्शन तसे दुर्मिळच. तुम्ही अभयारण्यात गेला तरीही वनराजाचे दर्शन तुम्हाला होईलच याची काहीच खात्री नाही. परंतु क्रिकेटचा विक्रमादित्य, भारतरत्न सचिन तेंडुलकरला हा नियम लागू होत नसावा किंवा त्याचे दर्शन घेण्यासाठी साक्षात वनराजही आतुर असावेत. सचिन तेंडुलकरने शनिवारी पत्नी अंजली व मुलांसमवेत गीर अभयारण्याची सैर केली. एखाद् दुसर्‍या सिंहाचे जवळून दर्शन व्हावे, अशी त्याची इच्छा होती. परंतु अडीच तासांच्या सचिनच्या रपेटीत सचिनला एक-दोन नव्हे, तर तब्बल 23 सिंहांचे दर्शन घडले. गीर अभयारण्यातील पर्यटनाचा अनुभव चांगला आणि अविस्मरणीय असल्याचे सचिनने म्हटले आहे. (छाया : जितेंद्र मांडविया)

छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा