आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sahastralinga Lake Found In Patan City At Gujarat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमधील पाटणमध्ये उत्खननात सापडला हजारों वर्षांपूर्वीचा सहस्त्रलिंग तलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सहस्त्रलिंग तलाव)

पाटण- गुजरातमधील ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 'पाटण' शहरात हजारों वर्षांपूर्वीचा सहस्त्रलिंग तलाव सापडला आहे. तत्कालीन राजा सिद्धराज जयसिंहद्वारा या सहस्त्रलिंग तलावाची निर्मिती केली होती.

सन 1935 पर्यंत या भागात घणदाट जंगल होते. पाटणमधील एका पुरातत्त्व तज्ज्ञाने या भागाचा एक नकाशा तयार केला होता. या आधारावर करण्यात आलेल्या उत्खननात एक पुरातन तलाव आढळून आला आहे. या तलावात 1008 शिवलिंगाची स्थापना करण्‍यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या पुरातत्त्व तज्ज्ञ त्याचा शोध घेत आहेत.

'पाटण' उल्लेख महाभारत....
'पाटण' हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा उल्लेख महाभारत देखील आढळतो. 'महाभारत' नुसार पांडवपूत्र भीम याने हिडिंब राक्षसाचा या ठिकाणी वध करून त्यांची बहीण हिडिंबा हिच्याशी विवाह केला होता. तलाव परिसरात अनेक प्राचीन लेण्या आहेत. आतापर्यंतच्या उत्खननात अनेक बहुमुल्य स्मारक सापडले आहेत. 'मसलन', 'पार्श्वनाथ मंदिर', 'राणी महल' आणि 'राणी वाव'चा समावेश आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा सहस्त्रलिंग तलावाचे PHOTOS....