आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म. गांधीजींच्या मीठ सत्याग्रहाचे शिल्प गोध्रात; ११ ऐवजी दाखवले १० सत्याग्रही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोध्रा (गुजरात) - गोध्रा नगरपालिकेने शहरात मिठाच्या सत्याग्रहाची शिल्पकृती तयार करवून घेतली आहे. पण त्यात माेठी गफलत झाली असून अकराऐवजी दहाच सत्याग्रहींच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मूळ शिल्पकृती दिल्लीतील मदर तेरेसा मार्गावर आहे. तेथील शिल्पात गांधीजींसह ११ सत्याग्रहींच्या मूर्ती आहेत. अकरा मूर्ती मार्ग म्हणूनही तो ओळखला जातो. परंतु गाेध्रा येथील शिल्पात एक सत्याग्रही कमी दाखवण्यात आला आहे.

तक्रारीनंतर प्रकार उघडकीस
याप्रकरणी पंचमहाल येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर ही बाब उघड झाली. तक्रारकर्ते दिग्नेश पारीख यांनी याबाबत सांगितले की, या सदोष शिल्पकृतीमुळे सत्याग्रहींबाबत चुकीची माहिती व इतिहास लोकांपर्यंत जात आहे. नगरपालिकेने केलेली ही मोठी चूक आहे. मूळ शिल्पामध्ये ११ मूर्ती आहेत. ५०० रुपयांच्या नोटेवरही मागील बाजूला हे शिल्प असून त्यात गांधीजींसह ११ सत्याग्रही दाखवण्यात आले आहेत. गांधीजींचा जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्येच गोध्रा पालिकेने एक शिल्प कमी दाखवून गांधीजींच्या मानवतेच्या व विश्वबंधुत्वाच्या संदेशाला धक्का पोहोचवला आहे. त्याबाबत तत्काळ योग्य ती कारवाई करून या शिल्पात दुरुस्ती करावी, अशी मागणीही पारीख यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...