आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच आडनावाच्या विक्रमाची तयारी, अमेरिकेचा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जागतिक विक्रमासाठी हरतऱ्हेने प्रयत्न होताना दिसतात. असाच एक विक्रम १६ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये होऊ घातला आहे. एकाच आडनावाचे सर्वाधिक लोक एकत्र येण्याचा हा विक्रम असेल. सारखेच आडनाव असलेले लोक एकत्र येण्याचा विक्रम सध्या आयर्लंडच्या नावावर आहे. नऊ सप्टेंबर २००७ रोजी गेलेगर या आडनावाचे लोक एकत्र आले होते. ही संख्या जगात सर्वाधिक होती. अहमदाबादमध्ये पटेल-शहा आडनावाचे लोक एकत्र येतील. ज्या आडनावाचे लोक सर्वाधिक असतील त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये केली जाईल. ही संख्या २५०० हून अधिक असणे अपेक्षित आहे.

दुसर्‍या आडनावाची नोंद लिम्का बुकमध्ये होईल. प्रशांत पटेल यांनी याचे आयोजन केले आहे. नवीन गोष्टी जाणून घेणे आणि आनंद मिळवण्यासाठी याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

लार्जेस्ट गॅदरिंग चिल्ड्रन इन फॅन्सी ड्रेस
1.पाच हजाराहून अधिक शालेय मुले विविध पेहरावात सहभागी होतील. शाळांमध्ये नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये होईल.

मिशीवाल्यांचीही विक्रमासाठी गर्दी
2.२०१०मध्ये २६ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत मिशा असणारे ११३१ लोक एकत्रित आले होते. अहमदाबादमध्ये दोन हजार मिशाधारी एकत्र येणार आहेत. त्यासाठी विक्रम आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

3. मोस्टग्रीटिंग कार्ड सेंट फ्रॉम सेम लोकेशन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक शुभेच्छा संदेश एकाच ठिकाणाहून पाठवले जाणार आहेत. अशा प्रकारचा विक्रम सध्या अमेरिकेच्या नावावर आहे. २०१३ मध्ये १८ जुलै रोजी हजार ९८४ ग्रीटिंग लिहून विक्रम करण्यात आला होता. अहमदाबाद या रेकॉर्डला आपल्या नावावर करण्यासाठी उत्साहित आहे. आतापर्यंत १२ हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे.