आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Vice President Pranav Mistri Is A Biggest Fan Of Modi

Real रॅन्चोः PM च्या सांगण्यावरून सॅमसंगचे उपाध्यक्ष पद सोडण्यास तयार, मोदींचा आहे चाहता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चीनी पत्नीसोबत प्रणव मिस्त्री )

पालनपूरः
सॅमसंग गॅलेक्सी गियरसाठी ओळखले जाणारे पालनपूरचे प्रणव मिस्त्री सॅमसंग कंपनीचे ग्लोबल उपाध्यक्ष बनल्यानंतर बनासकांठा भागातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. बनासकांठाच्या पालनपूरमध्ये जन्मलेले 33 वर्षीय प्रणव मिस्त्री कॉम्प्यूटर शास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. लग्नाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सॅमसंग कंपनीने प्रणव मिस्त्रीला ग्लोबल वाईस प्रेसिडेन्ट बनवले आहे. या आनंदाच्या क्षणी Divyamarathi.com ने प्रणव यांची बहीण श्वेता मिस्त्री यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या की, प्रणव चीन आणि भारतात खुपच प्रसिध्द आहेत. त्यांच्या घरात काही दिवसांपूर्वीच प्रणवला मुलगा झाला आहे.
प्रणव मिस्त्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते आहेत. त्यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी मोदींच्या सल्लागार मंडळात सहभागी होण्यास उत्सूक आहे. प्रणव यांनी अशी इच्छा व्यक्त करताच मोदींनी त्यांना आमंत्रण दिले. मोदींच्या एका इशाऱ्यावर प्रणव हायप्रोफाईल नोकरी सोडून स्वदेशात येण्यास उत्सूक आहे. प्रणवला भारताच्या विकासासाठी काम करायचे आहे, प्रणव ज्या पदापर्यंत पोहचले आहेत, ते पद खुपच खुपच मोठे आणि शक्तीशाली पद आहे. खुपच कमी लोक या पदापर्यंत पोहोचतात. प्रणवची भारतात येऊन एखाद्या गावात लहान मुलांना शिकवण्याची इच्छा आहे.
हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी स्वीकारून प्रणव स्पाँसरशीपवर पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत गेल्यानंतर 'सिक्स्थ सेन्स' चे संशोधक बनले. प्रणवने मायक्रोसॉफ्ट, गुगल, नासा, युनेस्को, कोर्नेगी मेलोन युनिवर्सिटी आणि जापान सायन्स अँड टेक्नोलॉजी यांसारख्या कंपन्यात काम केले आहे. मित्रमंडळीमध्ये प्रणवची ओळख झोम्बी अशी आहे.
प्रणवचे वडील किर्ती मिस्त्री आर्किटेक्ट आणि टेक्नो्क्रेट आहेत. त्यांनी आपल्या तेजस्वी मुलामधील हुशारी ओळखून अत्यंत अभ्यासपूर्वक त्याच्या शिक्षणाची योजना बनवली. घरात कॉम्प्यूटरसोबत खेळता खेळता प्रवणची सृजनशक्ती वाढली. अहमदाबादच्या निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मुंबईमध्ये इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रणव गेला. यानंतर प्रणवने अमेरिकेच्या मेसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीमध्ये प्रवेश घेतला. या दरम्यान प्रणव मिस्त्रीने सिक्स्थ सेन्सचे निर्माता म्हणून जगभरात प्रसिध्द झाले. याच इनोव्हेशनसाठी प्रणवला 2009 मध्ये पॉप्यूलर सायन्सचा पुरस्कारही मिळाला होता.
पुढील स्लाईडवर पाहा, प्रणव मिस्त्रीचे खासगी फोटो...