आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागांधीनगर- भाजपच्या संसदीय मंडळावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सामावून घेतल्यानंतर व त्यावर मोदींची छाप असल्याने हिंदुत्त्ववादी संघठना पुढे येऊन आपले मनसुबे जाहीर करु लागल्या आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यासारख्या कडव्या संघटनांचा समावेश आहे.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडि़या यांनी म्हटले आहे की, 2015 पर्यंत गुजरातला एक हिंदू राज्य म्हणून घोषित करण्यात येईल. येथील एका परिषदेने आयोजित केलेल्या संमेलनात तोगडिया रविवारी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मात्र कार्यक्रमात गैरहजर होते. अहमदाबादमधील कांकरिया फुटबाल मैदानावर आयोजित संमेलनात तोगडियांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, हिंदूंना केवळ समृद्धी हवी नाही तर त्याबरोबर सुरक्षेचीही गरज आहे.
तोगडिया म्हणाले, दोन वर्षाच्या आत व्हीएचपी गुजरातच्या सर्व 18 हजार गावांत पोहचणार आहे. त्यानंतर आम्ही गुजरातला हिंदू राज्य घोषित करणार आहोत. प्रत्येक गावात, शहरात, आदिवासी भागात जाऊन हिंदूची भेट घेणे आमचे लक्ष्य आहे.
'हिंदू संगम'च्या निमित्ताने केशूभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीचे काही सदस्यही उपस्थित होते. व्हीएचपीचे संयुक्त संघटन सचिव विनायक देशपांडे यांनी म्हटले की, या वर्षाच्या शेवटपर्यंत आम्ही दहा हजार लोकांपर्यंत पोहचणार आहोत. सध्या आम्ही सहा गावांपर्यंत पोहचण्याची रणनिती आखत आहोत.
'सुरक्षित हिंदू'चा मुद्दा उठवत तोगडिया म्हणाले, ''सुरक्षित राहण्यासाठी व समृद्ध बनविण्यासाठी हिंदूंना ख-या अर्थाने सक्रिय हिंदू बनून काम करावे लागेल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली. कारण हा कार्यक्रम मोदींच्या विधानसभा क्षेत्रात येतो.
विशेष म्हणजे, गांधीनगर तसेच अहमदाबादमधील अवैध मंदिरे पाडण्यासह अनेक मुद्यांवरुन मोदी आणि गुजरात व्हीएचपीमध्ये संघर्ष झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि नरेंद्र मोदी यांच्यातील मतभेद आता लपून राहिले नाहीत.
तोगडिया पुढे म्हणतात, आपल्याला फक्त व्यवहाराने हिंदू बनायचे नाही. आपल्याला तशी प्रॅक्टिस आणि जागरूकता याद्वारे हिंदू बनावे लागेल. तरच अयोध्यात राम मंदिर उभारण्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल.
दरम्यान, गुलबर्ग हत्याकांडातील आरोपी व व्हीएचपीमधील माजी नेता अतुल वैद्य यांनी म्हटले आहे की, इतके वर्ष तोगडियांनी आम्हाला विसरले. दंगलीत व्हीएचपी कार्यकर्त्यांना आरोपी बनविले. त्यावेळी तोगडि़या शांत होते. आज त्यांना पुन्हा हिंदूंची आठवण येत आहे. ते 'हिंदू संगम'च्या नावाखाली लाखो रुपये खर्च करीत आहेत मात्र आमच्या मदतीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.