आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्याजावर पैसे देणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या, विवस्र आढळला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत (गुजरात)- व्याजावर पैसे देणाऱ्या 43 वर्षीय सावकार महिलेची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह विवस्र अवस्थेत आढळल्याने बलात्कार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. महिलेचा घटस्फोट झाला आहे.
तिकीट बुकींग, मनी ट्रान्फरचा होता बिझनेस
- चलथाण येथील आर. के. कॉम्प्लॅक्समधील एका प्लॅटमध्ये मुळची बंगालची असलेली साधना कार्तिक राय राहत होती.
- तिकीट बुकींग, मनी ट्रान्सफरसह व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय ती करायची.
- याच कॉम्प्लॅक्समध्ये खाली तिचे दुकान होते. येथून ती सर्व व्यवहार करायची.
- पतीसोबत घटस्फोट झाला असल्याने ती एकटीच या फ्लॅटमध्ये राहायची.
- घटनेच्या दिवशी दुपारी तिची मुलगी शाळेत गेली होती. यादरम्यान तिची हत्या झाल्याचा संशय आहे.
- मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा दार खुलेच होते. तिच्या आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला होता.
- यावेळी साधनाच्या शरीरावर कपडे नव्हते. हे बघून तिची मुलगी जोरदार ओरडली.
- तिचा आवाज ऐकल्यावर शेजारी धावून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
दोन मुले झाले पोरके
- साधनाला दोन मुले होते. 16 वर्षांचा मुलगा अंजन रॉय आणि 13 वर्षांची मुलगी अंजली. अंजन पंजाबमध्ये शिकतोय. अंजली कडोदरा येथील लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये शिकत होती.
पुढील स्लाईडवर बघा, घटनेशी संबंधित फोटो.....
बातम्या आणखी आहेत...