आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राजवाड्याच्या जागेत मावतील चार बकिंघम पॅलेस, 700 एकर आहे परिसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा हे मराठ्यांच्या काळापासून स्वतंत्र स्थान होते. पेशव्यांचे सरदार गायकवाड हे येथील संस्थानिक होते. मराठी राज्याच्या वतीने ते गुजरात, राजस्थान इत्यादी भागांचा कारभार, आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सयाजीरावांकडे होती. हे शहर विश्वामित्री नदीच्या काठावर आहे. येथील सयाजी बाग सुंदर व प्रसिध्द आहे. एकेकाळी बडोदा हे पश्चिम रेल्वेचे एक मुख्यठिकाण होते .ह्या रेल्वेचे पूर्वीचे नाव -BAMBAY BARODA &CENTRAL INDIA बीबीसीआय असे होते.तसेच बडोद्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील सर्वात प्रसिध्द आणि चर्चेत राहिलेली वास्तू म्हणजे लक्ष्मीविलास पॅलेस.

लक्ष्मीविलास पॅलेस:
लक्ष्मी विलास पॅलेस हा गुजरातमधील प्रसिध्द ठिकाणांपैकी एक आहे. या पॅलेसची निर्मिती सयाजीराव गायकवाड (तीसरे) यांनी १८९० मध्ये केली होती. हा पॅलेस एवढा विशाल आहे की याचा अंदाज यावरून लावता येतो, की या पॅलेसच्या आवारात ब्रिटनचा सर्वात मोठा बकिंघम पॅलेससारखे चार पॅलेस लक्ष्मी विलास पॅलेसच्या आवारात उभे राहू शकतात. या पॅलेसच्या परिसर जवळपास 700 एकर भूभागात पसरला आहे. या परिसरात क्रिकेट मैदान, एक इनडोअर टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट,एक संग्रहालय आणि गोल्फ कोर्ससुध्दा आहे.या गोल्फ कोर्सवर फक्त बडोद्यातील अतिश्रीमंत लोकांनाच गोल्फ खेळायला परवानगी आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, या पॅलेसच्या निर्मितीसाठी किती आला खर्च आणि कोणी केले बांधकाम...
बातम्या आणखी आहेत...