आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींच्या आरोग्याचे रहस्य आहे हे फळ, किलोचा दर 30 हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीसोबतच त्यांच्या आरोग्याची खूप चर्चा होते. दिवसातील 16 ते 18 तास काम करणारे मोदी प्रवासही मोठ्या प्रमाणात करतात. मोदी शनिवारी 67 वर्षांचे होत असून आजही ते पूर्णपणे फीट आहेत. एवढे काम करुनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. त्यांच्या या आरोग्याचे गुपित मशरुम असल्याचा खुलासा स्वतः मोदींनी केला आहे.

या मशरूमची किंमत 30 हजार रुपये किलो
पंतप्रधान आता 66 वर्षांचे आहेत मात्र त्यांच्यातील स्फूर्ती अचंबीत करणारी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही कामाचा ताण जाणवत नाही. दिवसातील 15-16 तास काम करण्याची उर्जा मोदींना योगातून मिळते. ते दररोज योगा आणि व्यायाम करतात. त्याशिवाय हिमाचल प्रदेशातील मशरुम खातात. बाजारात या मशरूमची किंमत 25 ते 30 हजार रुपये किलो आहे.

मोदींनी स्वतः सांगितले गुपित
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव होते. तेव्हा त्यांच्याकडे हिमाचल प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी होती. तेव्हापासून ते मशरुमचे सेवन करतात. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकदा पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी आपल्या 'तंदरुस्ती'चे गुपित सांगितले होते. ते म्हणाले होते, 'माझ्या निरोगी शरीराचे गुपित हिमाचल प्रदेशातील मशरुम आहे. हे फळ अनेक गुणांनी युक्त आहे.'

शास्त्रीय नाव आहे माकरुला एक्स्यूलेंटा
या फळाचे शास्त्रीय नाव माकरुला एक्स्यूलेंटा आहे. मराठीत त्याला आळंबी म्हटले जाते. हिमाचलच्या डोंगराळ भागात ते उगवते. विदेशामध्ये त्याची मोठी मागणी आहे. हिमाचलच्या डोंगराळ प्रदेशातील लोकांच्या रोजी-रोटीचे ते प्रमुख साधन आहे. याची शेती केली जात नसून त्याचे नैसर्गिक उत्पादन होते. हिमाचलमधील हजार लोक त्याच्या शोधात जंगलांमध्ये भटकत असतात. व्यापारी 10-15 हजार रुपये किलोने त्याची खरेदी करतात आणि 25 ते 30 हजार रुपये किलोने विक्री करतात.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, मशरुम संबंधी FACTS
बातम्या आणखी आहेत...