आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५२५ सिंहांची सुरक्षा करताहेत तीन ‘वाघिणी’, कर्मचाऱ्यांवर डिस्कव्हरीने तयार केली डाक्युमेंट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुनागड त्या तीन महिलांना गुजरातच्या ‘वाघिणी’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांचे कामच तसे आहे. गुजरातच्या गीर जंगलामध्ये त्या बिनधास्त फिरतात. असे जंगल जे सुमारे सव्वापाचशे सिंहांचे निवासस्थान आहे आणि न जाणो किती बिबटे, मगर आणि त्यासारखी जनावरे येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्यात राहून काम करणाऱ्या वाघिणी आहेत, रसिला वाढेर, किरण पीठिया आणि दर्शना कागडा.
२००७ मध्ये जेव्हा या तिघींची वन कर्मचारी म्हणून निवड झाली त्या वेळी त्यांच्याकडे कार्यालयीन कामे देण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांच्याच संमतीने त्यांना जंगल क्षेत्रात तैनात करण्यात आले. डीएफआे डॉ. संदीपकुमार यांचे म्हणणे आहे की, ‘ज्या वेळी त्या कार्यालयीन कामे करत होत्या त्याच वेळी त्यांची इच्छा वनक्षेत्रात जाऊन काम करण्याची होती. त्यात यशस्वी झाल्या तर
अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी मेहनतीने काम केले. आज त्या बिनधास्तपणे काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी ८०० हून अधिक मोहिमांमध्ये भाग घेऊन सिंहांसोबतच अन्यही प्राण्यांना जीवदान दिले आहे. आम्हाला महिला सहकाऱ्यांवर गर्व आहे’.

आज रात्री ९ वाजता त्यांच्या शौर्याची गाथा पाहा
महिला वन कर्मचारी दर्शना, किरण आणि रसिला यांनी गेल्या ८ वर्षांत जेवढ्या मोहिमा यशस्वी केल्या त्याबाबत लोकांना खूप कमी माहिती आहे. त्यांच्या शौर्याविषयी डिस्कव्हरी चॅनलवर चार भाग दाखवले जात आहेत. इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि गुजराती भाषांमध्ये तयार झालेल्या डाक्युमेंट्रीचे प्रसारण संपूर्ण दक्षिण आशियामध्ये २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता करण्यात येणार आहे. हा भाग एक तासाचा असेल.

कोणाकडे काय दायित्व
रसिला वाढेर (डावीकडे) : मूळ कामच वन्यप्राण्यांची सुटका करणे.
किरण पीठिया (मध्यभागी) : वाघांची स्थानं शोधणे, सफारी संचालन.
दर्शना कागडा (उजवीकडे) : सिंह-बिबट्यासह अन्य प्राण्यांचे संरक्षण, जंगलातील शोधकार्याची जबाबदारी.