दमनः सेलवासमध्ये काल मानव अधिकार मिशनव्दारे रखोली पुलाजवळ छटपुजाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र येथे संध्याकाळच्या वेळेत होणार्या भजन, किर्तना इत्यादी धार्मिक कार्यक्रमाऐवजी अश्लिल नृत्य करून लोकांचे मनोरंजन करण्यात आले. मंचावर एक गायक आणि दोन महिलांनी अश्लिलतेची हद्द ओलांडून नृत्य केले. दोन्ही महिलांनी छोटो आणि उत्तेजक कपडे परिधान केले होते. तर पुरूष गायक या महिलांच्या कंबरेत हात टाकून अश्लिल कृत्य करत नाचत होता.
या प्रकाराबद्दल बोलताना बिहार जनसेवा संघ सेलवासचे उपाध्यक्ष नीतु विश्वकर्मा म्हणाले की, धार्मिक उत्सवाच्या नावावर आयोजित करण्यात आलेला हा अश्लिल कार्यक्रम अत्यंत चुकीचा आहे, छटपुजेचा उत्सवात महिला कुटुंबियांसाठी दोन दिवसांचे व्रज ठेवतात आणि पुजा आराधना करतात. या उत्सवाचे पावित्र्य कायम राहायला पाहिले. असे अश्लिल कार्यक्रम आयोजित करणे हे अत्यंत चुकीचे आहे.