आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sister First Time Celebrate Rakshabandhan With Her Brother After Gender Change In Vadodara

सेक्स चेंज करून झाला मुलगी, पहिल्यांदा अशी बांधली आपल्या भावाला राखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - बडोदा शहरातील ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खान हिने पहिल्यांदा रक्षाबंधनला आपला भाऊ रियाज खानला राखी बांधली. जोयाने वर्षभरापूर्वीच सेक्स चेंज करण्यासाठी ऑपरेशन केले होते. तो आता पुरुषपासून स्त्री बनला आहे. ट्रान्सफिमेल जोयाने सेक्स चेंज करून पहिल्यांदाच रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
 
लहान होते, तेव्हापासूनच माझ्यात स्त्रियांचे गुण होते...
 - भास्करशी बोलताना जोया म्हणाली की, मी लहान होते तेव्हापासूनच मला मुलांची सोबत आवडत नव्हती. मी नेहमी एका मुलीसारखेच जगू इच्छित होते. अगोदर आईवडिलांची याला परवानगी नव्हती, ते सातत्याने मला टोकायचे. मग अशा कठीण प्रसंगी माझा भाऊराया रियाजनेच माझी साथ दिली. एवढेच काय, माझ्या आईवडिलांनी मला घरातून बाहेर काढले होते, तेव्हा भाऊ रियाजनेच मला पाठिंबा दिला. त्याने मला आर्थिक मदतही केली होती. माझ्या सेक्स चेंजच्या ऑपरेशनसाठी त्यानेच पैसे उभे केले. आज मी जी काही आहे, ती फक्त माझा भाऊ रियाजमुळेच आहे.
 
जोयाने सर्वात आधी महादेवाला बांधली राखी
 - जोया म्हणाली, मी मुस्लिम आहे, पण सर्व धर्म माझ्यासाठी एकच आहेत. इतर तरुणींप्रमाणे माझीही इच्छा होती की मी भावाला राखी बांधावी. म्हणून मी सकाळीच भाऊ रियाजला फोन करून बोलावले. आज मुहूर्ताचा खूप कमी वेळ होता, म्हणून वेळ खासकरून पाळली. आता माझ्या आईवडिलांनी माझा स्वीकार केला आहे. रक्षाबंधनाला तेही आज माझ्या घरी आले होते. आज सर्वात आधी मी भगवान शिवशंकराला राखी बांधली.
 
बडोद्याची पहिली ट्रान्सफिमेल
-शहराची पहिली ट्रान्सफिमेल जोयाची ईश्वरावर गाढ श्रद्धा आहे. तिने आपल्या ईश्वरावर विश्वास ठेवून जी लढाई लढली ती खूप कठीण होती. दीड वर्षाआधी तिने आपले सेक्स चेंज केले. ऑपरेशन यशस्वी झाले. आज स्त्री बनल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे जोया सांगते. जोयाने टेलीवूडमध्ये एंट्री करण्यासाठी आपला व्हिडिओ बनवला आहे. ती फीमेल मॉडेलच्या रूपात काम करतेय.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...