अमरेली (गुजरात) - गुजरातमधील अमरेली शहरातील एका 17 वर्षांच्या मुलीने 21 वर्ष वयाच्या भावाचा गळा चिरून खून केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भाऊ लव्ह अफेयरमध्ये अडचणीचा ठरत असल्यामुळे युवतीने त्याचा खून केल्याचे मान्य केले आहे. तिने खेळाचे निमीत्त करुन भावाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, ओढणीने त्याचे हात बांधले आणि धारदार शस्त्राने गळा चिरला.
हत्येनंतर घरातून धावत बाहर येऊन सांगितले भावाचा खून झाला
चितलरोड भागात राहाणारे अॅड. रमेशभाई अरजणभाई यांचा मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी निकिता (नाव बदलेल आहे) हे दोघे बहिण-भाऊ सोमवारी घरी होते. या दोघांशिवाय घरात कोणी नव्हते. अचानक निकिता घरातून धावत बाहेर आली आणि ओरडत-रडत शेजाऱ्यांना भावाचा खून झाल्याचे सांगू लागली. शेजीर घरात आले तेव्हा सिद्धार्थ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
असा उघड झाला गुन्हा
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना शंका आली की घरात कोणालाच काही न कळू देता एवढ्या साफाइदारपणे खून कसा काय होऊ शकतो ? पोलिसांनी शेजारी विचारपूस केल्यानंतर त्यांना कळाले की मुलीचे अफेयर सुरु आहे. यावरुन तिचे आणि तिच्या भावाचे नेहमी भांडण होत होते. त्यानंतर पोलिसांनी युवतीची कसून चौकशी केली आणि तिने गुन्हा कबूल केला.
क्राइम पेट्रोल पाहून बनवला प्लॅन
निकीताने पोलिस चौकशीत सांगितले, की काही दिवसांपूर्वी तिने क्राइम पेट्रोल सिरियल पाहिली होती. त्यातूनच खून कसा करायचा याची कल्पना सुचली. त्यात दाखवण्यात आले होते, एक महिला पतीचा खून करण्यासाठी त्याला सरप्राइज देण्याच्या निमीत्ताने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधते मग दोन्ही हात बांधते.त्यानंतर महिला पतीला खुर्चीवर बसवते आणि मागून येऊन त्याचा गळा चिरते.
रक्ताचे डाग पूसण्यासाठी कपडे धूतले
निकिताने भाऊ सिद्धार्थचा गळा चिरल्यानंतर तो जमीनीवर पडला. त्यानंतर तिने चाकूने त्याच्या गळ्यावर आणखी वार केले. सिद्धार्थ रक्त्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना निकिताने तिच्या कपड्यांवर आणि अंगावर रक्ताचे डाग पडले होते ते धुवून काढले. कपडे वाळायला टाकले. त्यानंतर दुसरे कपडे घालून शेजाऱ्यांना बोलवायला गेली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो...