आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 मित्रांना वाचवण्यासाठी 4 मित्रांनी नदीत मारल्या उड्या, सर्व 6 जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदीतून मृतदेह काढताना अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि नागरिक. - Divya Marathi
नदीतून मृतदेह काढताना अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि नागरिक.
हिंमतनगर (गुजरात)- प्रांतीज तहसील कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गलतेश्वर महादेव मंदिराजवळ साबरमती नदीत बुडून 6 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्व तरुण रासलोड या गावातील होते. रक्षाबंधनानिमित्त ते महादेवाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी दोन मित्र साबरमती नदीत उतरले. पण त्यांना पोहता येईना. नदीचा प्रवाह मोठा होता. दोघे बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी इतर चार मित्रांनी नदीत उडया मारल्या. पण त्यांनाही पोहता आले नाही. त्यामुळे सहाही जणांचा नदीच्या पाण्यात बुडून मृ्त्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले. एका तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकाच गावातील सहा तरुणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मृ्त्युमुखी पडलेल्या तरुणांचे नाव
- केतन भट्ट (20)
- राजेश पटेल (20)
- अंकित पटेल (21)
- विकास पटेल (21)
- मंगलभाई पटेल (21)
- कमलेश पटेल (22)
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो.....
बातम्या आणखी आहेत...