आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आजीचा हात सोडून रस्त्यावर पळाली चिमुकली, बसने क्षणात चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- लहान मुलांवर लक्ष ठेवले नाही किंवा त्यांच्याबाबत पालक जागरुक राहिले नाहीत तर काय होऊ शकते, हे या घटनेतून दिसून येते. दीड वर्षांची चिमुकली आजीसोबत रस्त्याच्या कडेने चालत होती. अचानक तिने झटका देऊन आजीचा हात सोडला. रस्त्याच्या दिशेने धावत सुटली. यावेळी आलेल्या भरधाव बसने या चिमुरडीला जागीच चिरडले.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आरोही आहे. कुटुंबासह ती शाहिबाग परिसरात राहते. रविवारी रात्री आरोही आजीसोबत फिरायला गेली होती. दोघी रस्ता क्रॉस करणार होत्या. आजीने आरोहीचा हात पकडला होता. यावेळी आरोहीने झटका देऊन स्वतःचा हात सोडला. ती धावत रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करु लागली. यावेळी आलेल्या भरधाव बसले तिला जोरदार धडक दिली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या अपघाताचा जिवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ... आणि फोटो...