आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snakes And 19 Cubs Found In Gujrat Village House

PHOTOS: अंगणात नागिनसह निघाले 19 साप, लोकांचा उडाला थरकाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवसारी (गुजरात) - गणदेवी तालुक्यातील रहेज गावात रविवारी दुपारी एकाचवेळी 15-20 साप दिसल्याने खळबळ उडाली. छगन पटेल यांच्या दारात एवढे साप निघाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. जवळपास तीन तासांच्या मेहनतीनंतर अॅनिमल सेव्हिंग ग्रुपने या सापांना पकडले आणि वन विभागाच्या स्वाधीन केले.
रहेज गावातील छगन पटेल यांच्या घराच्या अंगणातील झाडाच्या डोलीतून दोन-तीन साप बाहेर येताना त्यांना दिसले. त्यांना काही कळायच्या आत आणखी 10-15 साप बाहेर आले. छगन यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला आणि साप निघाल्याची माहिती अॅनिमल सेव्हिंग ग्रुपला कळवली.
माहिती मिळताच ग्रुपचे सदस्य तातडीने गावात दाखल झाले. तोपर्यंत साप निघाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली होती. लोकांची गर्दी वाढल्याने सापांनीही आसपास आश्रय घेण्यास सुरुवात केली. एका मातीच्या बिळात साप गेले होते. अॅनिमल सेव्हिंग ग्रुपच्या सदस्यांनी बिळात पाइपने पाणी भरले तर एक-एक करत सर्व साप बाहेर येऊ लागले. ग्रुपच्या सदस्यांनी त्यांना पकडण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वात शेवटी नागिन बाहेर आली, तिला पकडून काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. निगिनसह 19 साप पकडण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो