आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: घरातील सर्व खोल्यांमध्ये साप आढळून आल्याने उडाली धावपळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरबंदर (गुजरात)- येथील वाणंद सोसायटीमधील एका घरात काल रात्रीच्या सुमारास प्रचंड धावपळ उडाली. बघता बघता अनेक साप घरातील प्रत्येक खोलीत पसरले. घरातील सर्व सामानांवर चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परिस्थिती लक्षात येताच घरातील सर्व सदस्य बाहेर पळाले. त्यांनी ग्रीन वाइल्ड कंझरव्हेशन सोसायटिला याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या टीमने सुमारे तीन तास मेहनत करुन सर्व सापांना पकडले. यावेळी 50 पेक्षा जास्त साप पकडण्यात आले.
रोकडीया हनुमान मंदिराजवळ राहत असलेले लखन परमार यांना रात्री 8 च्या सुमारास किचनमध्ये सापाचे पिलू आढळले. त्यांनी जरा जवळ जाऊन बघितले. त्याच्या बाजूला आणखी दोन-चार पिले आढळून आली. त्यांनी इतर खोल्यांमध्ये सामानाची तपासणी केली. तर त्याखाली सापच साप दिसून आले. त्यानंतर त्यांनी घरातील सर्व सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितले. स्वतःही बाहेर गेले आणि ग्रीन वाइल्ड कंझरव्हेशन सोसायटिला माहिती दिली.
सोसायटीच्या टीमने सांगितले, की हे विषारी साप नाहीत. पोरबंदर परिसरात असे अनेक साप आढळून येतात. ते एकावेळी 70 ते 80 अंडी देतात. सापाच्या मादाने घराजवळ अंडी दिली असतील. त्यानंतर तापमानामुळे सर्वांनी घरात आश्रय घेतला असावा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घरी जागोजागी सापडले साप.... असे गोळा करण्यात आले...