आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BJP - काँग्रेसमध्ये सोशल वॉर: मी आहे विकास v/s विकास वेडा झालाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत. सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसने राज्यात सध्या निवडणूक यात्रा काढल्या आहेत. ते सोशल मीडियावर परस्परांविरुद्ध टीकाही करत आहेत... 
 
अहमदाबाद भाजप-काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांचे नेते जनतेत गेले आहेत. तेथे दोघांत शाब्दिक युद्ध तर सोशल मीडियावर कंटेंट वॉर सुरू आहे. मुद्दा विकासाचा आहे. काँग्रेस विकास वेडा झाल्याचे म्हणत आहे. भाजप विकासाला आदर्श म्हणत आहे. ‘विकास वेडा झाला आहे,’ असे काँग्रेसने २३ सप्टेंबरला म्हटले होते. उत्तरात भाजपने ‘विकासाला चंदूकाकांच्या चष्म्यातून पाहण्याचा’ सल्ला दिला होता. तेव्हापासून त्यांच्या आयटी शाखा परस्परांविरुद्ध कंटेंट व्हायरल करत आहेत. 
 
भाजप आयटी सेल : विकास मॉडेल लोकांच्या हृदयात बसवण्याचा प्रयत्न आहे 
 } टीम : १०० सदस्यीय चमू. ७१००० स्वयंसेवक. वॉर रूम अहमदाबाद, गांधीनगर, सुरतमध्ये. गुजरात आयटी सेलशी जुळण्यासाठी दररोज २००० रिक्वेस्ट येत आहेत. 
} पृष्ठभूमी: भाजप कार्यकर्ते आणि सोशल मीडियावर सक्रिय भाजपचे लोक. 
} पदवी : पत्रकारिता, सामाजिक शास्त्रे, कला आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी. 
} कसे होते काम :आयटी सेल २४ तास काम करतो. मुख्य चमू कंटेंट तयार करतो. व्हायरल टीम ते सोशल मीडियावर पोहोचवते. नंतर स्वयंसेवक ते व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ग्रुप्समध्ये शेअर करतात. 
}हेतू : विकासाबद्दल लोकांना सांगणे. 
} संचालन : अमित ठाकर, पंकज शुक्ल. 
}पेज: मोदी गेले दिल्लीला, त्याचा लाभ झाला गुजरातला, - मोदी रंग लागा, माता नर्मदेची गाथा ७० वर्षे जुनी, १७ दिवसांत आणले पाणी. 
} सोशल मीडिया फॉलोइंग : २२ लाख फेसबुक फाॅलोअर्स. फेसबुक पेज- बीजेपी गुजरात, ट्विटरवर ४.३ लाख फॉलोअर्स. ट्विटर अकाउंट-बीजेपी गुजरात. 
 
काँग्रेस घोषणेने आम्हाला हलवू शकत नाही 
काँग्रेसएका घोषणेने भाजपला हलवू शकत नाही. भाजपने किती विकास केला, हे जनता जाणते. ती स्वत: याला उत्तर देत आहे. सोशल मीडिया युजर्समध्ये भाजप-काँग्रेसच्या पोहोचण्याचे प्रमाण ९० : १० आहे.
-अमित ठाकर, प्रमुख,आयटी सेल-गुजरात भाजप 
काँँग्रेसची राजवट जनतेला माहिती आहे 
‘विकासवेडा झाला आहे’ हा काँग्रेसचा विचार असू शकतो, गुजरातच्या जनतेचा नाही. काँग्रेसच्या काळात राज्याची स्थिती काय होती, हे जनता जाणते. 
-अमित मालवीय, 
राष्ट्रीय आयटी सेल प्रमुख-भाजप 

काँग्रेस आयटी सेल : हा विकास नाही, तर अपयश सिद्ध करण्याचा प्रयत्न अाहे... 
} टीम: ५० सदस्य. हे मजकूर तयार करतात. २,५०० स्वयंसेवक. काँग्रेसने २०११ मध्ये पंचायत स्तरावर आयटी सेल बनवला हाेता. या सेलने बहुतांश गावांतील लाेकांना साेशल मीडियाबाबत माहिती दिली हाेती. 
} पृष्ठभूमी: काँग्रेसचे कार्यकर्ते, पक्षनेत्यांची मुले तसेच स्वयंसेवक. 
} पदवी: राज्यशास्त्र,जनसंवाद, विपणन. 
} कसे चालते काम : मुख्यचमू, स्वयंसेवक राेज १० तास काम करतात. चमू सकाळी ८.३० वाजेपासून रात्री दाेन वाजेपर्यंत सक्रिय असते. रिसर्च, कंटेंट रायटिंग, क्रिएटिव्ह व्हायरल अशा चार चमू अाहेत. त्या भाजपच्या खाेटेपणाचा शाेध घेत असतात. 
} उद्देश: काँग्रेसआयटी सेल व्यंग, व्हिडिअाे, अाॅडिअाे काेणताही वैयक्तिक हल्ला करत नाही. 
} संचालन: राेहन गुप्ता 
} पेज: ब्लफमास्टरमाेदी, विकास वेडा झाला अाहे, फेकूमॅन, गुजरातविराेधी माेदी अादी. फाॅलाेइंग:२.५ लाख फेसबुक फाॅलाेअर्स. पेज- काँग्रेस गुजरात. २६ हजार टिवटर फाॅलाेअर्स. टि्वटर अकाउंट : गुजरात काँग्रेस. 

काँग्रेसची गाणी 
{गुजरातची जनता म्हणते, ‘विकास’ वेडा झाला अाहे. 
{येथे महागाईचा विकास झाला अाहे. 
{येथे पेट्राेलच्या दरात विकास झाला अाहे. 
{येथे शाळांच्या शुल्काचा विकास झाला अाहे. 
{येथे विकास अत्याचारी झाला अाहे. 

भाजपची गाणी 
{प्रत्येक गुजरातीचा एकच अावाज- मी विकास अाहे, मी अाहे गुजरात. 
{वर्षानुवर्षांचा विश्वास. 
{अचल हे गुजरात. 
{प्रगतीचा वेग, वाढेल हा गुजरात. 
{अाहे समृद्धी सर्वांकडे. 
(ही गाणी गरब्यात भाजप काँग्रेसने बनवली होती.) 
बातम्या आणखी आहेत...