आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमनाथ मंदिराला ४०.२७ किलो सोने!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरावळ - गुजरातच्या सोमनाथ ज्योतिर्लिंग महादेव मंदिरास मुंबईतील भाविकाने ४०.२७ किलोग्रॅम साेने अर्पण केले आहे. त्याची किंमत १०.८१ कोटी रुपये आहे. यातून मंदिराचे गर्भगृह, शिखराच्या आतील भाग, दरवाजावर सुवर्णपत्र्याचे आवरण चढवले जाईल.
मंदिर ट्रस्टचे संचालक विजयसिंह चावडा म्हणाले, मुंबईचे हिरे व्यापारी दिलीपभाई लखी यांनी अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी ४०.२७ किलो सोने अर्पण केले. दिलीपभाई लखी यांनी सांगितले की,"आम्हाला सुवर्णदान करण्याची संधी मिळाली. सोमनाथ धाम न्यासच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. सोमनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांच्या आत्मीय भावातून आमची श्रद्धा आणखी दृढ झाली आहे.'

लखी परिवाराने याआधीही सोमनाथ मंदिरास ५१ किलो सोने दान केले आहे. त्यातून सोमनाथाचे गर्भगृह, घुमट, शंकराचे ित्रशूल, डमरू आदींवर सोनेरी आवरण चढवले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही भगवान शंकराला सुवर्ण त्रिशूल अर्पण केले होते.
बातम्या आणखी आहेत...