आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: अवघी तीन फुट उंची असलेल्या विवेकसाठी बनवली दोन फुटची स्पेशल स्पोर्ट्स बाइक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- गुजरातमधील सुरतमध्ये राहणारा 22 वर्षीय विवेक चौहाणची उंची अवघी तीन फुट आहे. आपल्या बरोबरीचे मित्र सुसाट बाईक पळवतात. मात्र, आपल्या शारीरिक व्यंगामुळे आपल्याला तसे करता येत नसल्याने विवेक नेहमी दुखी असायचा. ठेंगण्या शरीरयष्टीमुळे विवेक शानदार स्पोर्ट बाइकवर स्वार होऊन कॉलेज कॅम्पसमध्ये स्टाइलिश एंट्री करू शकत नव्हता. अशा स्थितीत 3 फुटी विवेकसाठी स्पोर्ट्स बाइक तर दूरच परंतु साधी बाइक देखील मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती. मात्र, सुरतमधील बाइक डिझायनर मनय बनारसी याने विवेकची इच्छा पूर्ण केली.

बाइक डिझायनर मनयने विवेकसाठी फक्त दोन फूट उंचीची गिअरलेस आणि वजनाने हलकी बाइक डिजाइन केली आहे. आपल्यासाठी मनय अपाल्यासाठी बाइक डिझाइन केल्याने विवेक जाम खुश आहे. विशेष म्हणजे विवेकची ही बाइकने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे.

बाइक डिजाइनर मनय बनारसीच्या शब्दात...
उंची कमी असल्याने पायाचे पंजे लहान असतात. त्यामुळे गिअर बदलण्यास खूप अडचणी येतात. गिअर लहान आकारात केले तरी क्लच दाबण्यासाठी हाताची बोटे लहान पडतात. यामुळे मी ही बाइक गिअरलेस ठेवली आहे. शिवाय या बाइकचे वजन फक्त 50 किलो ठेवले आहे. त्यामुळे विवेक सहज ही बाइल हाताळू शकतो.
विवेक म्हणाला, ‘माझी उंची अवघी तीन फूट आहे. तसेच माझे हात आणि पाय देखील लहानच आहेत. त्यामुळे मी आयुष्यात कधीच बाइक चालवू शकणार नाही, असे मला नेहमी वाटत होते. मात्र, मनय बनारसी याने माझे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने माझ्यासाठी लहान बाइकची बांधनी केली, हे माझ्यासाठी अप्रुप आहे. माझी बाइकची उंची फक्त दोन फुट आहे. त्यामुळे मी ती सहज चालवू शकतो. आता मीही माझी स्पोर्ट्स बाइक घेऊ म‍ित्रासोबत फिरायला निघतो. मी खूप आनंदी आहे. माझा आनंद कोणत्या शब्दात व्यक्त करावा हे देखील मला कळत नाही आहे.
विवेकच्या स्पोर्ट्‍स बाइकचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...
(23 इंचाची बाइकवर स्वार विवेक चौहाण)