आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Tour Package For Narendra Modi\'s Birthplace Only For Rs 600

PM च्या गावची सफर 600 रुपयांत, मोदी कुठे चहा विकायचे तेही बघा..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 1950 मध्ये वडनगर, मेहसाना, गुजरातमध्ये एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेले नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. एक चहा विकणारा कधी देशाचा पंतप्रधान बनेल असा विचारही कोणी केला नसेल. पण पंतप्रधान आणि त्यांचा चहा, या दोन्हींची गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा झाली आहे. मोदींचे बालपण अत्यंत रंजक राहिले आहे. आता देशाच्या प्रत्येक नागरिकाला ते जाणून घेण्याची संधी मिळणार आहे, तीही अवघ्या 600 रुपयांत. गुजरात टूरिझमने मोदींचे गाव फिरण्यासाठी ही ऑफर सुरू केली आहे.

ऑफरमध्ये काय काय असेल
तुम्ही केवळ 600 रुपयांत हे जाणून घेऊ शकता की, मोदींचा जन्म कुठे झाला होता? ते कोणत्या ठिकाणी चहा विकत होते? ते कोणत्या शाळेत शिकले? एवढेच काय पण तुम्हाला मोदींच्या वर्गमित्रांनाही याठिकाणी भेटता येणार आहे. गुजरात पर्यटन महामंडळ लिमिटेड (टीसीजीएल) आणि अक्षर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने ही खास ऑफर देण्यात आली आहे. त्यात दर रविवारी तुम्हाला अहमदाबादहून मोदींच्या गावाला फिरवण्यासाठी नेले जाईल. या टूरचे नाव ‘अ राइज फ्रॉम मोदीज विलेज’ असे ठेवण्यात आले आहे.

सकाळी आठला सुरू होईल टूर
अहमदाबाद आणि गांधीनगरमधून सकाळी 8 वाजता हा टूर सुरू होईल. यात सर्वात आधी मोधेरायेथील सूर्य मंदिराचे दर्शन घेता येईल. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता टूर वडनगरला पोहोचेल. येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांना पारंपरिक गुजराती थाळीमध्ये जेवण दिले जाईल. त्यानंतर सुरू होईल, मोदींच्या गावाची सफर.
पुढील स्लाइड्वर जाणून घ्या, या टूरमध्ये काय पहायला मिळणार...