आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Vehicle For Rape Case Investigation News Inn Marathi

‘निर्भया’च्या नावाने ‘विशेष तपासणी वाहन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - बलात्कारासारख्या प्रकरणांत पुरावे गोळा करण्यासाठी ‘विशेष तपासणी वाहन’ तयार केले जात असून त्याचे नाव ‘निर्भया’ असे ठेवण्यात आले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे वाहन न्यायालयीन विज्ञान प्रयोगशाळा (एफएसएल) प्रमाणेच घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी सक्षम राहील. मुंबईची एक कंपनी अशा प्रकारचे वाहन तयार करून देणार असून पहिल्या टप्प्यात गुजरातच्या काही प्रमुख शहरांमध्ये त्यांना तैनात केले जाणार आहे. देशाच्या अन्य राज्यांत तसेच राष्ट्रीय स्तरावरही अशा प्रकारची वाहने बनवून देण्याची योजना कंपनीने बनवली आहे. डिसेंबर 2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार घटनेनंतर महिला शोषणाशी संबंधित प्रत्येक प्रकरणात ‘स्पॉट इन्व्हेस्टिगेशन’च्या आवश्यकतेवर भर देण्यात आला आहे.

तितिक्षा देसाई या वाहन निर्माता कंपनीच्या वैज्ञानिक आहेत. त्यांच्या मते, अशा प्रकारचे विशेष तपास वाहन तयार करण्यासाठी साधारण 30 लाखांपर्यंत खर्च येतो. यात पीडितांच्या मदतीसाठी आवश्यक वैद्यकीय उपचार, बोटाच्या ठशांसाठीचे किट, पुरावा गोळा करण्यासाठीचे किट तथा फोरेन्सिक नर्सिंग आदी उपकरणे राहतील. वाहनात मानसोपचारतज्ज्ञ, सायंटिफिक अधिकार्‍यासहित 3 महिला अधिकारी तैनात असतील.

घटनेचा उलगडा आणि सिद्धतेसाठी सहायक
गांधीनगर एफएसएलचे संचालक जे. एम. व्यास यांच्या मते, महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात घटनास्थळावरून पुरावे मिळवणे अत्यंत आवश्यक असते. अशा प्रकारच्या प्रसंगात पीडिता मनोवैज्ञानिक रूपाने तणावग्रस्त होऊन जातात. अशा वेळी पीडिता माहिती देण्याच्या स्थितीत नसते. त्यामुळे घटनेनंतर ताबडतोब माहिती मिळवणे कठीण होते.