आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या खटला 2019 निवडणुकांशी कसा जोडता? सिब्बल यांच्या वक्तव्यावर मोदींचा हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धंधुका (गुजरात) - नरेंद्र मोदींनी बुधवारी येथे एका निवडणूक सभेत तीन तलाक आणि अयोध्या प्रकरणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या वक्तव्यावरून हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, सिब्बल यांनी कोर्टात मुस्लीमांच्या हक्काबाबत बोलावे, बाबशी मशीद प्रकरणी युक्तीवाद करावा, त्यावर आमचा आक्षेप नाही. पण ते अयोध्या खटला आणि 2019 च्या निवडणुका यांचा संबंध कसा लावू शकतात. 


मोदींनी उचलले 2 महत्त्वाचे मुद्दे.. 
राम मंदिर प्रकरण 
मोदी म्हणाले, सिब्बल मुस्लीम समाजाकडून लढत आहेत, यावर काहीही आक्षेप नाही. पण निवडणुकीपूर्वी हा मुद्दा सोडवला जाऊ शकत नाही, असे ते कसे म्हणू शकतात. या मुद्द्याचा लोकसबा निवडणुकीशी काय संबंध. काँग्रेस म्हणतेय की सिब्बल जे म्हणाले, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. 


तीन तलाक
तीन तलाकचा मुद्दा सुप्रीम कोर्टात होता तेव्हा सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलेल होते. वृत्तपत्रांमध्ये आले की मोदी युपी निवडणुकांमुळे काही बोलायला तयार नाहीत. निवडणुकीत पराभव होऊ नये म्हणून या मुद्द्यावर न बोलण्यास सांगण्यात आल्याचे मला म्हटले गेले. पण तीन तलाकवर शांत बसायचे नाही हे मी ठरवले होते. सर्वच गोष्टी निवडणुकीशी संबंधित नसतात. आधी माणुसकी आणि नंतर निवडणुका असतात. 


काय म्हणाले मोदी... 
- गुजरातची तरुण पिढी भाजपमुळे दंगलींपासून दूर आहे. 
- सुरक्षा ही जनतेला गुजरातने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. गुजरातच्या जनतेला सुरक्षा प्रदान करताना मी अनेक आरोप झेलले आहेत. 
- मी एवढी वर्षे काही माळ जपत बसलेलो नव्हतो. काम करत होतो. काँग्रेसने 60 वर्षांत केले त्याच्या 10 पट अधिक काम आम्ही 10 वर्षांत केले आहे. 
- लोकांचे जीवन अधिक चांगले व्हावे, त्यांना चकरा माराव्या लागू नये यासाठी आम्ही काम करत आहोत. 
- शेतकरी जे काही कर्ज घेतली, त्या कर्जाचे व्याज सरकार भरेल. 
- भाजपनेच गुजरातमधील टँकरराज संपुष्टात आणले आहे. काँग्रेस नेते आणि त्यांच्या कुटुंबांकडे टँकरचा बिझनेस होता. 
- एका कुटुंबाने डॉ. बाबासाहेब अंबेडकर आणि सरदार पटेल यांच्याबरोबर अन्याय केला आहे. काँग्रेसमध्ये नेहरूंच्या प्रभावामुळे डॉ. अंबेडकरांना संविधान सभेत जायलाही अडचणी आल्या. 


सुप्रीम कोर्टात मंगळवारी काय घडले
- अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पुन्हा एकदा भाषांतराच्या मुद्द्यावर अडखळली. एकूण 19,590 पानांपैकी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे 3260 पेज जमा झाले नाही. 
- मंगळवारी सुनावणी टाळण्याची मागणी करत बोर्डाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, हा खटला केवळ राम जन्मभूमी वादाचा नाही. राजकीय मुद्दाही आहे. त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांनंतर सुनावणी करावी. 
- कोर्टाने हा युक्तीवाद निरर्थक असल्याचे सांगत, आम्ही राजकारण नव्हे, तथ्य पाहतो असे सांगितले आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सुनावणी 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. 

 

बातम्या आणखी आहेत...