आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spicejet Flight Hits Buffalo During Takeoff At Surat Airport

सुरत विमानतळावर म्हशीला धडकले विमान; थोडक्यात बचावले 140 प्रवाशांचे जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: क्षतिग्रस्त इंजिनाचा हा फोटो एका टि्वटर यूजरने शेअर केला आहे

सुरत - विमान टेकऑफ होत असताना म्हशीला धडकल्यामुळे सुरत विमानतळावर मोठा अपघात टळल्याची घटना घडली आहे. अपघात झालेले हे विमान स्पाइस जेटचे असून सुरतहून ते दिल्लीकडे रवाना होण्यासाठी निघाले असताना हा अपघात घडल्याचे अधिका-यांनी सांगितले. यावेळी विमानात एकूण 140 प्रवासी प्रवास करत होते. ही घटना गुरूवारी (ता.6) संध्याकाळी सातच्या सुमारस घडली.
त्याचे झाले असे की, सुरत ते दिल्ली स्पाइसजेटचे विमान टेकऑफ करण्यासाठी उडाले खरे पण, नेमके टेकऑफ करताना धावपट्टीवर असलेली एक म्हैस विमानाच्या इंजिनाला धडकली. त्यामुळे इंजिनाचे मोठे नुकसान झाले. यानंतर हे विमान रद्द करण्यात आले आहे.
ही घटना गुरुवार संध्याकाळी 7 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर स्पाइसजेटने सूरत एयरपोर्टवरून त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण अनिश्चितकाळासाठी रद्द केले आहेत.
पुढे पाहा क्षतिग्रस्त विमानाचे फोटो...