आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • St Bus Down From Pull Near Vyara And 45 People Injured

तापी नदीत कोसळली नंदुरबार- अहमदाबाद बस, 45 प्रवाशी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- गुजरातमधील व्यारा तालुक्‍यातील कासद गावाजवळ आज (मंगळवारी) सकाळी नंदुरबार (न‍िझर)- अहमदाबाद बस तापी नदीत कोसळली. या दुर्घटनेत 45 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्‍ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रवाशांना बाहेर काढायला लागला एक तास...
- बचाव पथकासोबत परिसरातील नागरिकांनी येथे तत्‍काळ मदतकार्य सुरू केले.
- जखमींना 108 रुग्णवाहिकेतून हॉस्‍पिटलमध्‍ये पाठवण्‍यात आले.
- प्रवाशांना बसमधून बाहेर काढायला एक तास लागला.
- घटनेचे प्रत्यक्षदर्शी नितीनभाई यांनी अपघाताविषयी माहिती दिली.
नितीनभाई म्‍हणाले..
'मी उकाईचा रहिवासी असून सुरतला नोकरी करतो. मी सकाळी कारमधून सुरतला जात असताना मी हा अपघात पाहिला. समोर धावत असलेली बस (GJ-18-Y-7794) पुलावरून थेट
नदीत कोसळली. ही घटना पाहून मी प्रचंड घाबरलो. मित्रांना सोबत घेऊन मी मदतकार्याला सुरूवात केली. सर्वांना बाहेर काढायला एक तास लागला.'
ताबा सुटल्‍याने अपघात..
- रात्री पाऊस झाल्‍याने रस्‍त्यांवर पाणी होते.
- त्‍यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण् सुटल्‍याचे बोलले जात आहे.
- वाहकाचा पाय बसच्‍या सीटमध्ये फसला होता.
- ही बस निझरवरुन अहमदाबादला जात होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, बस अपघाताचे फोटो...