आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Commit Suicide To Jupm From 12th Flour Is Surat

शिक्षकाची आई-वडिलांकडे तक्रार, HSCच्या विद्यार्थ्याने घेतली 12व्या मजल्यावरून उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांचा मृतदेह (उजवीकडील फोटो) व आत्महत्या करण्यासाठी 12 व्या मजल्यावर उभा विद्यार्थी - Divya Marathi
विद्यार्थ्यांचा मृतदेह (उजवीकडील फोटो) व आत्महत्या करण्यासाठी 12 व्या मजल्यावर उभा विद्यार्थी
सुरत- शहरात परवत पाटिया भागात एका विद्यार्थ्याने अपार्टमेंटच्या 12व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राकेश बाबरिया (18) मृत युवकाचे नाव असून तो 12 वीचा विद्यार्थी होता. राकेशला काही कारणास्तव शाळेत शिक्षकांनी रागावले होते. इतकेच नव्हे तर त्याच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून त्याची तक्रार केली होती. याचा राकेशला प्रचंड राग आला होता. रागाच्या भरात त्याने बिल्डिंगवरून उडी घेऊन आत्महत्या केली.

या कारणामुळे राकेत होता नाराज...
- राकेश हा सुरतमधील पुणा भागातील ‘समर्पण टेक्नॉलॉजी’ स्कूलचा 12वीचा विद्यार्थी होता.
- राकेशला काही दिवसांपूर्वी त्याच्या शिक्षकांनी रागावले होते.
- शिक्षकांनी राकेशची तक्रार स्कूल मॅनेजमेंटकडेही केली होती.
- स्कूल मॅनेजमेंटने राकेशच्या आई-वडिलांना शाळेत बोलावले होते. यामुळे राकेश नाराज होता.
- राकेशने शुक्रवारी दुपारी 12 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

मोबाइलमध्ये कैद झाली घटना...
- अपार्टमेंटमध्ये राहाणार्‍या एकाने ही घटना आपल्या मोबाइलमध्ये कैद केली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेचा व्हिडिओ व फोटोज: