आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाला शिवीगाळ,नंतर विद्यार्थ्‍याने घेतली 11 व्‍या मजल्‍यावरून उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- शिक्षकाशी गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गात बसू न दिल्यामुळे त्याने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुजरातमध्ये घडली. राकेश बाबरिया (१८) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. सुरतच्या पूणा भागातील समर्पण टेक्नो स्कूलमध्ये विज्ञान शाखेत १२ मध्ये शिकत होता.

११ मजली इमारतीचे वॉचमन राजेश यादव म्हणाले, दर्शन रेसिडेंटचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून राकेश हळूच छतावर पोहाेचला. त्यानंतर तो संरक्षक कठड्यावरून वाकून खाली पाहत होता.
दोन मिनिटे त्याने काही तरी विचार केला. तो छतावर असल्याचे पाहून काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला आवाज दिला. परंतु त्याने लगेच उडी मारली. राकेशचे भावजी मयंक जैन म्हणाले, त्याचे शिक्षकाशी बिनसले होते.
शिक्षकाला बोलला
शाळेचे विश्वस्त जनक सावलिया म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वागण्यातील बदल दिसत होता. आनंदी झाल्यावर चांगला वागत होता; परंतु त्याला अचानक रागही येत होता.