सुरत - शिक्षकाकडून होणाऱ्या सततच्या अपमानाला कंटाळून गुजरातमध्ये एका नववीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वडिलांच्या नावे अंतिम इच्छा प्रकट करताना सुसाइड नोटमध्ये म्हटले होते की, ‘पापा, शाळेतील अर्जुन सरांच्या गालावर १० - २० चापटा मारा...’ सुरत येथील हर्ष जितूभाई शहा (१४) या िवद्यार्थ्याने िशक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तो एलएनबी दलिया शाळेत अडाजण येथे िशकत होता.
मृत्यूपूर्वी सुसाइड नोटमध्ये त्याने विचित्र अंितम इच्छा प्रकट करताना म्हटले होते की, शाळेतील अर्जुन सर त्याला खूप मारत होते व त्रास देत होते. मृत्यूपूर्वी त्याने पेनने स्वत:च्या हातावरही अर्जुन असे लिहिले होते. अर्जुन हे शाळेतील पीटीच्या सरंाचे नाव आहे. हर्षला पाहून ते हिंस्र होत असत. याप्रकरणी िशक्षकाची चौकशी केली जात आहे.