आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीसाठी आयआयएम विद्यार्थ्यांना दोन वर्षे ब्रेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - विद्यार्थ्यांना नोकरीचा अनुभव मिळावा म्हणून अहमदाबादची भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम-ए) दोन वर्षांची सवलत देणार आहे. नव्या सत्रापासून ही सवलत लागू होईल. संस्थेच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे चेअरमन प्रा. शैलेश गांधी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. अमेरिकेसह इतर देशांतील व्यवस्थापन संस्थांत अशी व्यवस्था आहे. देशात अहमदाबाद आयआयएम पहिले ठरणार आहे. तथापि, संस्थेत प्रवेशासाठी प्रथमच निवड झालेल्या १० टक्के विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल. म्हणजेच पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या ३८५पैकी ३८ टक्के विद्यार्थी लाभ घेऊ शकतील. आयआयएम-एची २०१५-१७ ची बॅच पुढील अाठवड्यात सुरू होईल.


फायदा काय
{ नोकरीचे प्रॅक्टिकल ज्ञान मिळेल
{ बायोडाटा भक्कम होईल.
{वेतनातून शिक्षणासाठी बचत.
{ नोकरीचा अनुभव व आयआयएम पदवीमुळे करियर उज्ज्वल.
बातम्या आणखी आहेत...