आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या कार्यक्रमाला गेले नाही म्हणून विद्यार्थ्यांना केले निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडोदरा (गुजरात) - मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमास हजेरी न लावणे सहा विद्यार्थ्यांना भलतेच महागात पडले आहे. या अनुपस्थित विद्यार्थ्यांवर शाळा व्यवस्थापनाने पाच दिवसांसाठी निलंबित केले.
वडोदरा येथील नवरचना हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. हे सर्व विद्यार्थी आठवी ते दहावीच्या वर्गातील आहेत. या प्रकारामुळे वाद वाढल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी मोदींच्या उपस्थितीत मांजलपूर येथे क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले होते. शहरातील अर्धा डझन शाळांमधील तीन हजार विद्यार्थी त्यासाठी उपस्थित होते. त्यात सहभागी होण्यास सहा विद्यार्थ्यांनी नकार दिला होता. त्याची त्यांना शिक्षा भोगावी लागली.