आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत: अम‍ित शहांच्या कार्यक्रमात पाटीदारांनी फेकल्या खुर्च्या; 1 तासातच कार्यक्रम गुंडाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- पाटीदार बहुल सुरतमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांच्या कार्यक्रमात गुरुवारी जोरदार गोंधळ झाला. हार्दिक पटेलच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘हार्दिक जिंदाबाद’ म्हणत खुर्च्या भिरकावल्या आणि ‘अमित शहा गो बॅक’ च्या घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. विजय मानगुकीया या हार्दिक पटेलच्या निकटवर्तीयाने या असंतुष्ट पाटिदारांचे नेतृत्व केल्याचे वृत्त आहे.

गोंधळ एवढा जबरदस्त होता की चार तासांच्या कार्यक्रमात मंचावर शहा चार मिनिटे आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी के‌वळ दोनच मिनिटे बोलू शकले. भाजपशी संबंधित पाटीदारांतर्फे शक्तिप्रदर्शनासाठी आयोजित ‘पाटीदार अभिनंदन सोहळ्या’त हा राडा झाला.

पुढील स्लाइडवर पाहा, ‘हार्दिक जिंदाबाद’ म्हणत पाटीदारांनी भिरकावल्या खुर्च्या आणि ‘अमित शहा गो बॅक’च्या दिल्या घोषणा....
बातम्या आणखी आहेत...