आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surat Builder Pulls His Land Cruiser Car By Dunkeys

PHOTOS: एक कोटींच्या कारला जुंंपले गाढव, निषेधासाठी बिल्डरचा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत - एक कोटी रुपयांची लँड क्रुजर कार रोडवरुन चालल्यानंतर लोकांच्या नजरा वळतातच. डायमंड सिटी सूरतमध्ये देखील असे दृष्य पाहायला मिळाले, पण येथे गाढव पुढे-पुढे आणि लँड क्रुजर मागे मागे. गाढव रोडवर कार ओढत होते, असे चित्र लोक कुतुहलाने पाहात होते, तर कोणी फोटो काढत होते. सुरतचे बिल्डर तुषार घेलाणी यांची लँड क्रुजर वारंवार खराब होत असल्याने मेंटेनंन्सने त्रस्त होत त्यांनी कंपनीचा निषेध करण्यासाठी असा आगळावेगळा मार्ग निवडला.
शोरुम सर्व्हिसने होते नाराज
बिल्डर तुषार घेलाणी म्हणाले, एक कोटी रुपयांची लँड क्रुजर खरेदी केली. सुरुवातीपासूनच कार त्रास देत होती. शोरुमवर घेऊन गेल्यानंतर ते चांगली सर्व्हिस देत नव्हते. स्पेअर पार्ट्स बदलायचे तर ते मुंबईहून मागवावे लागत होते. चार-चार दिवस कार सर्व्हिस सेंटरमध्ये पडून राहात होती. त्यांचा आरोप आहे, की ऑइल चेंज आणि ट्यूनिंगसारख्या कामासाठीही 3-4 दिवस लागत होते. या मुळे त्रस्त होऊन त्यांनी कारला गाढवांकडून ओढून निषेध नोंदवला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बिल्डरचा प्रताप