सुरत (गुजरात) - सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया यांनी 70 कर्मचा-यांना कारची भेट दिली आहे. याशिवाय 30 कारागिरांना कारच्या किमतीचे दागिने व रोख पैसे दिले आहेत. हे शंभर कारागीर ढोलकिया यांच्या हरिकृष्ण एक्स्पोर्ट कंपनीत हि-यांना पैलू पाडण्याचे काम करतात. कर्मचा-यांचा समाजातील मानमरातब वाढावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे ढोलकिया म्हणाले. सर्वांना दिलेल्या कार एकाच कंपनीच्या आहेत.
चांगले काम करणा-यांना इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय झाला, पण कर्मचा-यांना सांगितले नाही. इन्सेंटिव्हचे पैसे जमल्यावर उरलेले पैसे कंपनीने टाकले आणि कर्मचा-यांसाठी कार खरेदी केल्या.