आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सुरतच्या आमदार संगीता पाटील यांच्यासाठी RTO चे नियम बसवले धाब्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरटीओचे नियम सर्वांसाठी सारखे असतात. पण सुरतच्या आमदार संगीता पाटील यांच्यासाठी आरटीओच्या नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
सुरतच्या आरटीओ कार्यालयात कॉम्प्युटराईज ड्रायव्हिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. वाहतूक परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची या ट्रॅकवर टेस्ट घेतली जाते. आरटीओच्या नियमांप्रमाणे दुपारी 4.30 पर्यंत ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. पण सुरतच्या लिंबायत मतदारसंघातील आमदार संगीता पाटील यांच्यासाठी नियम बदलण्यात आले. सायंकाळी 7.30 वाजता त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर लगेच त्यांना ड्रायव्हिंग लायसन्सही देण्यात आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, आरटीओ कार्यालयात कॉम्प्युटराईज ड्रायव्हिंग ट्रॅकवर टेस्ट देताना संगीता पाटील...